गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू पिंपरूड फाट्याजवळील घटना ; चार जण जखमी

फैजपूरजवळील पिंपरूड फाट्याजवळ कार झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे निधन; कुटुंबातील चार जण जखमी.

जळगाव जिल्ह्यातील पिंपरूड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात गोदावरी नर्सिंगचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा मृत्यू; कुटुंबातील चार जण जखमी.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे (वय ४८, रा. रोझोदा, ह.मु. जळगाव) यांचे फैजपूरजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात १४ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हे हे १३ मे रोजी कुटुंबासह भुसावळ येथे चुलत भावाच्या लग्नासाठी गेले होते. लग्नकार्य आटोपून ते आपल्या मूळगावी रोझोदा येथे परतत असताना पिंपरूड फाट्याजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. वाहन रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळल्याने हा भीषण अपघात घडला.

या अपघातात प्रवीण कोल्हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. १५) त्यांचे निधन झाले.

या अपघातात त्यांच्या कुटुंबातील आई उषा प्रल्हाद कोल्हे (६९), पत्नी हर्षा प्रवीण कोल्हे (३८), मुलगी निर्मिती प्रवीण कोल्हे (१०) आणि वहिनी भावना निलेश कोल्हे (४१) जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रवीण कोल्हे यांच्या निधनामुळे गोदावरी शिक्षण संस्थेत शोककळा पसरली असून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनीही शोक व्यक्त केला आहे.

या घटनेची नोंद नशिराबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील पंचनामा फैजपूर पोलिस ठाण्यात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!