रिक्षा चालकाची टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण करत प्रवाशांना शिवीगाळ

ठाण्यातील राबोडी परिसरात रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून टीएमटी बस चालकावर हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

सार्वजनिक वाहतुकीच्या बसमध्ये घुसून चालकाला मारहाण आणि प्रवाशांना शिवीगाळ केल्याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रस्त्यात उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून रिक्षाचालकाने ठाणे महापालिकेच्या टीएमटी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना राबोडी परिसरात घडली. याप्रकरणी राबोडी पोलिसांनी रिक्षाचालकासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नासीर शेख (४०) असे रिक्षा चालकाचे नाव असून तो राबोडी भागात वास्तव्यास आहे. तर गोकुळ पाटील असे टीएमटी चालकाचे नाव आहे. २० जूनला दुपारी ते बसगाडी घेऊन साकेत ते पंचगंगा मार्गे चेंदणी कोळीवाडा या मार्गावर कर्तव्य बजावत होते. तर बसगाडीमध्ये महिला वाहक आणि २० ते २५ प्रवासी प्रवास करत होते.

दुपारी सुमारे २.३० वाजताच्या सुमारास बसगाडी सरस्वती शाळेसमोर आली असता रस्त्यात एक रिक्षा उभी असल्याने बसगाडीस वाहतूक करण्यास अडथळा निर्माण झाला होता. गोकुळ यांनी रिक्षा बाजूला घेण्यासाठी बसगाडीचा भोंगा वाजविला. त्यावेळी रिक्षामधून एक व्यक्ती खाली उतरली आणि रिक्षा बाजूला घेतली. त्यानंतर रिक्षा चालक आणि त्याच्या साथिदाराने बसगाडीमध्ये चढून चालकाच्या गालावर आणि डोळ्यावर ठोसे मारले.

बसगाडीमधील प्रवाशांनी याबाबत जाब विचारला असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर गोकुळ यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. पोलीस कर्मचारी आल्यानंतर त्यांनी बसगाडी राबोडी पोलीस ठाण्यात आणली. मारहाण करणारा रिक्षा चालक नासीर हा देखील आला होता. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!