जळगावातील विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करताना नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण कामांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी यांनी आज मेहरून येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना कामे विहित कालावधीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मेहरुण येथे उभारण्यात येत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी करताना,आयुक्त गेडाम यांनी उपलब्ध सुविधा, नियोजन आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी संकुलातील विविध प्रस्तावित सुविधांची माहिती सादर केली.

उपलब्ध निधीचा अधिकाधिक परिणामकारक वापर करून खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, यासाठी नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना आयुक्त प्रवीण गेडाम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी महापौर दीपमाला काळे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी तसेच क्रीडा कार्यालयाचे दिपक जगदाळे, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त किशोर चौधरी, सचिन निकम यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
