वाढदिवसाचे औचित्य साधून उद्योजक किशोर कडू यांनी रायगड जिल्ह्यात वृक्षारोपण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
उरण तालुक्यातील सोनारी गावचे उद्योजक तथा श्री सद्गुरू कृपा इंटरप्राइजेसचे मालक आणि श्री सदगुरु कृपा फ्रेट सर्विसेस, श्री सद्गुरू कृपा लॉजिस्टिक्सचे संचालक श्री. किशोर कडूसाहेब यांचा ६०वा वाढदिवस सोमवार, दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त सोनारी येथील श्री बैठक हॉल परिसरात श्री. किशोर कडूसाहेब यांनी त्यांच्या व्यवस्थापन आणि परिवारासोबत नारळांच्या वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच रायगड जिल्ह्यातील आलिबाग तालुक्यातील वरसोली गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी दोन वॉटर प्युरिफायर भेट देऊन विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. 
याचबरोबर उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर प्राथमिक शाळेतील ७० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून शिक्षणाला हातभार लावण्याचा जो सुंदर उपक्रम राबवला आहे, तो खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. या उपक्रमाबद्दल शाळेचे व्यवस्थापन, मुख्याधापक, शिक्षकवर्ग, शालेय व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थ्यांनी श्री सद्गुरू कृपा फ्रेट सर्विसेसचे संचालक श्री किशोर कडूसाहेब व त्यांच्या पत्नी संचालिका सौ. सेजल किशोर कडू यांचे मनःपूर्वक आभार मानत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. किशोर कडूसाहेब यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये बाफना मोटर्सचे चेअरमन बाळू बाफना साहेब, मेसर्स जे. एम. बक्षी सीएफएसचे सीएफएस हेड व्हीपी श्री. अजितकुमार सिंग साहेब, तसेच मेसर्स हिंद कॅरियर प्रा. लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक (ऑपरेशन) श्री. प्रमोद शिंदेसाहेब ,जनरल मॅनेजर (ऑपरेशन) श्री. रामदास मोरे साहेब ,असिस्टंट जनरल मॅनेजर (ऑपरेशन) श्री. विवेक कदम साहेब, श्री सद्गुरू कृपा फ्रेट सर्विसेसचे एच. आर. मॅनेजर श्री. गजानन शिंदेसाहेब, मनसे नेते संदेश ठाकूरसाहेब विभागातील सरपंच, सदस्य, उद्योजक, विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार तसेच श्री सद्गुरू कृपा फ्रेट सर्विसेस, श्री सद्गुरू कृपा लॉजिस्टिक्स व श्री सद्गुरू कृपा इंटरप्रायझेसचे व्यवस्थापन, कर्मचारी व कामगार वर्ग यांचा समावेश होता.
सायंकाळी कडूसाहेबांच्या निवासस्थानी भावनिक वातावरणात त्यांच्या पत्नी सौ. सेजल कडू व मुलींनी तसेच परिवारातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने ६० दिव्यांनी औक्षण करून त्यांच्या निरोगी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्या पत्नी सौ. सेजल किशोर कडू त्यांच्या मुली तसेच परिवाराने केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, हितचिंतक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांचे कडू परिवाराने मनःपूर्वक आभार मानले.
वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी परत देण्याची संधी आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक वृक्ष लावावा, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी आणि आपल्या परीने समाजोपयोगी कार्य करावे असा संदेश देत साजरा झालेला हा वाढदिवस उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
