आंदोलन हे लोकशाहीचा एक शृंगार 

भारतीय संविधानाची प्रतिमा मध्यभागी, त्यामागे शांततामय आंदोलन करणारा नागरिकांचा समूह, हातात संविधानिक हक्क आणि न्यायाचे संदेश असलेले फलक, पार्श्वभूमीला भारतीय तिरंगा आणि लोकशाहीचे प्रतीकात्मक दृश्य. प्रतिमेवर “स्थानिक समाचार” लोगो आणि www.sthaniksamachar.com समाविष्ट करावे.

भारतीय लोकशाही, संविधानिक हक्क, सत्याग्रह आणि अन्यायाविरुद्ध जनआंदोलन यांचे महत्त्व स्पष्ट करणारा प्रशांतराज सुपडू तायडे यांचा विचारपूर्ण लेख.

‘ लोकशाहीच्या शृंगाराने सजविला आंबेडकराने हा देश सारा’ हे एका गाण्याचे बोल तुम्हा आम्हाला आपल्या भारतीय संविधानाच्या मूलतत्त्वांचा वैभवशाली,उज्वल, प्रखर वाद अन्यायाविरुद्ध आपण स्वतःच उठाव केला पाहिजे तरच आपल्या स्वतःवर होणारा अन्याय आपण दूर करू शकतो एवढंच नाही तर त्या पुढील आपल्या तरुणांवर कोणीही तसा अन्याय करण्याची कोणी हिंमत करू शकणार नाही. एवढा मोठा प्रचंड ज्वालामुखी स्वाभिमान हा आपण एखाद्या अन्यायाच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनातून, सत्याग्रहांमधून स्वतःसाठी व आपल्या सम असणाऱ्या सर्वांसाठी जागृत करून ठेवू शकतो. ज्यावेळी आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा अभ्यासपूर्वक पद्धतीने एक चाणाक्ष्य नागरिक तथा विद्यार्थी म्हणून जर अभ्यास केला तर प्रत्येक वेळी कुठेतरी एक अन्याय विरुद्ध ठिणगी पडते परंतु ती ठिणगी प्रज्वलित राहण्यासाठी मानवी समूहाने एकत्र येणे सुद्धा आवश्यक आहे. मग जर सर्वांना एकत्र करायचे असेल आणि अन्यायाच्या विरुद्ध तेवढेच सकारात्मक बंड करायचे असेलच तर आंदोलन शांतपणे किंवा घोषणाद्वारे करणे हे प्रत्येक वेळी यशस्वी झालेले बहुतांश वेळी दिसून येते. आपण साधारण काही उदाहरणांचा जर विचार केला तर इतिहासात सैनिकांमध्ये एका दारूगोळ्यावरून भारतीय वंशाच्या सैनिकांच्या भावनात्मकतेशी खेळ करण्याचा एक प्रयत्न त्यावेळच्या ब्रिटिश शासनाच्या सरकारने केला आणि त्याची उलट प्रतीकात्मक प्रचिती अशी झाली की तेव्हा ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध त्यांच्या सैन्यामध्ये नोकरी करणाऱ्या आपल्या भारतीय नागरिकांनी उठाव करून 1857 मध्ये ब्रिटिश शासनाच्या अन्यकारक जुलमी शासनविरुद्ध होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली.

आंदोलन सत्याग्रह रुपी धोरण म्हणजे हे फक्त समवयस्कर काही विशिष्ट तरुणांनी एका धोरणासाठी एकत्र येऊन दिलेल्या घोषणा,गाणे, बोधपर वाक्यरचना प्रोत्साहन पर गीत प्रेरणादायी गाणी स्फूर्तीदायक कविताच नाही तर आंदोलन म्हणजे एखाद्या प्रसंगी घटनात्मक धोरणात्मक किंवा वैचारिक दृष्टीने जर आपण विचार केला तर अन्यायाच्या विरुद्ध ज्यांच्या मनात धगधग धडपड आणि आपल्या देशाच्या भारतीय संविधानिक लोकशाहीवर असणारे अपार प्रेम आदर यामधून मानवी मानवतावादी समाजावर वर्तमान काळात किंवा येणाऱ्या भविष्यकाळात एखाद्या अल्प कालावधीत जर अन्याय होत आहे असे एखाद्या तरुण मित्र समूहाच्या लक्षात आले तर ते प्रशासनाच्या विरुद्ध आपण आपल्या धोरणानुसार जो मानवी समाज हिताचा आहे यासाठी आपण उठाव हा त्याच वेळी केलाच पाहिजे जेणेकरून मग आपल्या स्वतःवर व आपल्यासारख्या असंगे तरुण मित्रांवर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर कोणताही कोणीही प्रकारचा अन्याय करण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही यासाठी वर्तमान जीवन जगताना तरुणांनी सत्तेच्या विरुद्ध कोणतेही हत्यार न वापरता पुकारलेला एक उठाव म्हणजे आंदोलन.

आंदोलन हे कधीही ठरवून किंवा सांगून होत नाही तर यासाठी आधी मानवतावादी मानवी समाजावर अन्यकारक परिस्थिती तयार होत असते ती अन्यकारक परिस्थिती ही फक्त शोषण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही तर ज्यांच्या संदर्भात काही विशिष्ट धोरण हे राबविण्याचा प्रयत्न केला आणि त्या धोरणातून काही नागरिकांचे जर शोषण सुरू झाले आहे हे जेव्हा समाजातील काही विकसित व सुशिक्षित मुलांच्या लक्षात येऊन ती जेव्हा त्यांच्या जिव्हारी लागते तेव्हा खरी मनात सत्तेच्या विरुद्ध ठिणगी पडते आणि हीच ठिणगी व्यापक रूप धारण करून पुढे मग आंदोलनातून समोर येते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास जर आपण अभ्यासून पाहिला तर सन 1920 नंतर महात्मा गांधीजींचे या स्वातंत्र्यसंग्राम मध्ये सहभाग होतो त्यानंतर महात्मा गांधीजींनी अनेक वेळा जुलमी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध आंदोलन असहकार सत्याग्रह विविध प्रकारे केली ती करण्यासाठी अनेक वेळ नागरिकांना प्रथम एकत्र करून उपस्थित नागरिकांना आपण हे आंदोलन का करणार आहोत ते जनतेला पटवून देत असत त्यांची ती गोष्ट नेहमी समाजभिमुख अन्याविरुद्ध असायची यामुळे महात्मा गांधीजींना प्रत्येक आंदोलनात ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध स्थानिक आपल्या भारतीय नागरिकांकडून प्रचंड असा प्रतिसाद सकारात्मक मिळत असे याच जन प्रतिसादाचे गमक म्हणजे विरुद्ध लढण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा जिद्द व उत्साह मिळत गेला याचीच प्रचिती म्हणजे शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पण यासाठी असंख्य भारतीय नागरिकांची आंदोलनात सत्याग्रहात तेव्हाचा असणारा प्रचंड असा असणारा प्रतिसाद याकडे कानाडोळा करून कधीही चालणार नाही समूह शक्ती ही आपल्या भारतीय लोकशाहीचे तेजोमय गमक आहे.

“अन्यायाला वाचा — माझे आंदोलन
स्वाभिमानाचा कणा — माझे आंदोलन
तरुणांचे तेज — माझे आंदोलन
एकतेचे प्रतीक — माझे आंदोलन!”

एवढं मोठं बलस्थान हे शृंगारूपी भारतीय लोकशाही आंदोलनात आहे जो कोणी कोणत्याही प्रकारचे घाबरत नाही त्याकडे कानाडोळा करतो कोणताही अन्याय इतरांवर करताना मनात थोडीही माणुसकी भावना प्रेम जिव्हाळा वडीलधाऱ्यांच्या सूचनांचा काही आदर बाळगतच नाही तर फक्त स्वतःच्या निर्णयांचाना प्राधान्य मानतो. अशा व्यक्तीला त्यांच्याकडून जनतेवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराची जाणीव जर आपल्याला करून द्यायची असेल तर यासाठी एकमेव दर्जेदार प्रभावी माध्यम म्हणजे राष्ट्रभावना राष्ट्रभक्ती स्वतःच्या मनाशी ठेवून त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध केलेला उठाव म्हणजे जन आंदोलन होय.

आंदोलन म्हणजे फक्त समूह गोळा करून आरोड्या मारणे किरकाळ्या मारणे हल्लकल्लोळ करणे सरकारी संपत्तीचा उद्ध्वंस करण्यासाठी व सामाजिक वातावरण गढूळ करण्यासाठी जमलेला लोकसमुदाय नाही तर एका नव्या विचारांनी वैचारिक क्रांती घडवून आणण्यासाठी समाजवादी धर्मनिरपेक्ष बंधुतावादी विचारसरणीची पेरणी करून समाजात एक क्रांतिकारक अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची फुंकर किंवा बिजारोपण म्हणजेच आंदोलन होय. विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे सांगतात की या भूमीवर अन्याय करणाऱ्या व्यक्ती पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त अन्यायाला जबाबदार असतो यावरून असे लक्षात घ्यावे की कधीही जर एखादी गोष्ट घटना प्रसंग धोरण आपल्याला जर ते अन्यायकारक वाटत असेल तर आपण निश्चितच त्याच्याविरुद्ध बंड हा पुकारलाच पाहिजे .

लेखक – प्रशांतराज सुपडू तायडे सर
मु. पो. कर्की ता. मुक्ताईनगर जि. जळगाव
मो नं 9665831581

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!