Quick Heal Foundation तर्फे नागपूरमध्ये सायबर जनजागृती; अनोळखी कॉल, संशयास्पद संदेश व लिंकपासून सावध राहण्याचे नागरिकांना आवाहन.
नागपूर, ९ सप्टेंबर : सिटाबर्डी, नागपूर येथील मोदी नं. २ परिसरात गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साहपूर्ण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. धार्मिक उत्सवाच्या या आनंदसोहळ्याला सामाजिक जनजागृतीची जोड देत उपस्थित नागरिकांना सायबर गुन्हे आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी Quick Heal Foundation तर्फे Cyber Warriors उर्वशी कुंभारे आणि रोहन सोनवणे उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत दैनंदिन डिजिटल व्यवहारांमध्ये उद्भवू शकणाऱ्या विविध सायबर धोक्यांची माहिती सोप्या आणि समजण्यास सुलभ भाषेत दिली.
यावेळी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, बनावट लिंक, OTP फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता, अनोळखी फोन कॉल आणि संशयास्पद संदेश यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धतींबाबत नागरिकांना माहिती देत कोणत्याही संशयास्पद संदेशाला किंवा लिंकला प्रतिसाद देण्यापूर्वी त्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ज्वाला ताई धोटे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी Cyber Warriors उर्वशी कुंभारे आणि रोहन सोनवणे यांच्याकडून देण्यात येणारी सायबर सुरक्षेविषयक माहिती जाणून घेतली. नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षितता राखण्यासाठी OTP, PIN, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे Cyber Warriors यांनी स्पष्ट केले. तसेच अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे, अनोळखी कॉलवर वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती देऊ नये आणि ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
गणेश आगमनाच्या उत्साहासोबतच सायबर सुरक्षिततेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. धार्मिक आणि सामाजिक उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
