यशवंतराव चव्हाण विद्यालय, अचिर्णे येथे स्पर्धा परीक्षा कार्यशाळा; पंढरीनाथ राणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील यशासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
अचिर्णे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण विद्यालय, अचिर्णे येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व लेखक श्री. पंढरीनाथ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेत श्री. पंढरीनाथ राणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आवश्यक असलेले अभ्यासाचे नियोजन, विषयांचा योग्य पद्धतीने अभ्यास, प्रश्न सोडविण्याच्या पद्धती, वेळेचे व्यवस्थापन तसेच परीक्षेतील यशासाठी आवश्यक बाबी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
स्पर्धा परीक्षांसाठी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच परीक्षेची तयारी करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यशाळेचा एकूण ७० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना श्री. राणे यांनी मार्गदर्शनपर उत्तरे देत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात आवश्यक माहिती दिली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक विचारांना अभिवादन करत विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
