जळगाव शहरातील हॉटेल आदित्याजवळील रिक्षा स्टॉपवर पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हर्षल विनोद वाणी (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) २५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हॉटेल आदित्यासमोरील बंगला चौकातील रिक्षा स्टॉपजवळ उभा होता. यावेळी आरोपी हर्षल विनोद वाणी (मजुरी काम करणारा) आणि कृष्णा सोनवणे (पबजी) दारूच्या नशेत त्या ठिकाणी आले.
सुरुवातीला आरोपींनी फिर्यादी हर्षल आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करत, “तू माझ्या भावाला मागच्या वेळी का मारहाण केली होती?” असा ताबडतोब जाब विचारला. वादाचा तणाव वाढताच आरोपीने आपल्या खिशातील चॉपरसारखे धारदार शस्त्र काढून हर्षलच्या पाठीवर वार केला, ज्यात हर्षल गंभीर जखमी झाला. सध्या त्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर फिर्यादी हर्षलने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकॉ. योगेश बेलदार करत आहेत.
शहरात वाढत्या अशा हिंसक गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
#crime #jalgaon_police #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
