वाघुड येथे ‘समतेचे निळे वादळ’ नामफलकाचे अनावरण

मलकापूर तालुक्यातील वाघुड येथे आंबेडकर जयंतीनिमित्त ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले.

वाघुड येथे ‘समतेचे निळे वादळ’ संघटनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक समतेचा संदेश.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मलकापूर तालुक्यातील वाघुड येथे ‘समतेचे निळे वादळ’ या सामाजिक संघटनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमातून सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ‘समतेचे निळे वादळ’ ही संघटना समाजातील वंचित, दुर्बल आणि सर्वसामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहील, असे प्रतिपादन केले.

गावकऱ्यांच्या उपस्थितीत नव्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला मलकापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, मोहन खराटे, दिलीप इंगळे, दीपक मेश्राम, सरपंच सचिन तायडे, मुन्ना रायपुरे, भारत सुरळकर, सुपडा ब्राह्मणे, सुरेश तायडे, अनिल इंगळे, अरुण तायडे, निलेश तायडे, राहुल तायडे, गौतम तायडे, देवराम शिरसाट यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे वाघुड परिसरात सामाजिक एकता आणि जागरूकता वाढीस लागण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!