टॉवर चौक परिसरातील लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा छापा; व्यवस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल.
शहरातील गजबजलेल्या टॉवर चौक परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने (AHTU) धडक कारवाई करत कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या कारवाईत लॉज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांना टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ९ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.३५ वाजता पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. व्यवहार निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला असता तेथे अनैतिक व्यापार सुरू असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी लॉजचा व्यवस्थापक राजू मोतीराम जोशी (वय ४५, मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेला उमाकांत बुधा महाजन (वय ३८, रा. भुसावळ) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईदरम्यान एका २८ वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली.
छाप्यात पोलिसांनी १० हजार ६५० रुपयांची रोख रक्कम, बनावट ग्राहकाला देण्यात आलेली ५०० रुपयांची चिन्हांकित नोट, तीन मोबाईल हँडसेट तसेच आक्षेपार्ह साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोलीस हवालदार अर्चना भावसार आणि त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
