जळगावात प्रेमप्रकरणातून तरुणाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या. मृताच्या नातेवाईकांनी संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १५ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव असून मृत्यूपूर्वी आईशी झालेला शेवटचा संवाद आणि त्यावेळी सुरू असलेला मोबाईल कॉल यामुळे ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघेही ४ मे रोजी घरातून निघून गेले होते. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी दोघे जळगाव रेल्वे स्थानक परिसरात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळाली होती. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तिला ताब्यात घेतले.
तरुणीला नातेवाईक घेऊन गेल्यानंतर गणेशने आईला फोन केला. या वेळी त्याने भावनिक संवाद साधत इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा फोटो शेअर करत “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईशी बोलताना तो म्हणाला, “आई, मी मोठी चूक केली आहे. हा माझा तुला शेवटचा कॉल आहे,” असे सांगत त्याने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली.
धक्कादायक बाब म्हणजे, उडी घेतल्यानंतरही मोबाईलवरील कॉल सुरू असल्याचे समोर आले. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता मोबाईलवर आईचा आवाज ऐकू येत होता, त्यामुळे परिसरात काही काळ शोककळा पसरली.
या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. दबाव, शिवीगाळ आणि धमक्या देऊन गणेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
