शाहू महाविद्यालयात एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीचा संदेश

लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि महाविद्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत जनजागृती करण्यात आली.

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

 वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा जनजागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक आणि डिजिटल व्यवहारातील सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.

या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भोसले यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना विविध सायबर धोक्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत माहिती दिली.

ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे, अनोळखी फोन कॉल किंवा संदेशांना प्रतिसाद देताना काळजी घेणे आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!