ठाणे जिल्ह्यातील भारत मुक्ती मोर्चा विविध मांगण्यासाठी उल्हासनगर तहसील कार्यालयावर धडकणार  : Bharat Mukti Morcha Protest in Ulhasnagar

ठाणे जिल्ह्यातील भारत मुक्ती मोर्चा विविध मांगण्यासाठी उल्हासनगर तहसील कार्यालयावर धडकणार  

ठाणे जिल्ह्यातील सर्व ओबीसी व सर्व घटकातील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन 

ठाणे -दि.२३ मार्च २०२६ रोजी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक संघटनांच्या वतीने भारतातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर विशालमोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर तहसील कार्यालयावर ही धडक दिली जाईल 

  आमच्या मांगण्या ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणेसाठी केंद्रशासनाने जे नोटिफिकेशन केले त्यात ओबीसी प्रवर्गातील जातींची नोंद होईल असा रकानाच नसल्याने केंद्रशासन ओबीसींची दिशाभुल करीत आहे.युजीसी कायदा करण्यात आला परंतु सुप्रीम कोर्टात तकलादु युक्तिवाद करण्यात

आला.यामुळे एस.सी.,एस.टी.व ओबीसी विद्यार्थ्यांशी धोकेबाजी करण्यात आली.२०११ पुर्वी शिक्षक म्हणुन लागलेल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षेतुन (TET) या परिक्षेतुन वगळण्यात यावे या तीन मुद्द्यांवर उल्हासनगर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

रॅलीचा मार्ग सुभाष टेकडी उल्हासनगर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पासून -गुरू नानक शाळा -नेताजी चौक गांधी रोड तहसील कार्यालय येथे समारोप असा असणार असून ठाणे जिल्ह्यातील सर्व ओबीसी, विद्यार्थी,पालक,शिक्षक,व शिक्षकांच्या परिवारातील सर्व बंधु व भगिनींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शैलेश सालवे यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!