जळगाव शहर पोलीस ठाण्यातील ४५ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव! ६० दिवसांत मालकी हक्क सिद्ध करण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आवाहन. वाचा सविस्तर प्रक्रिया
जळगाव : जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या आवारात विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेली सुमारे ४५ बेवारस वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. या वाहनांचे मालक अद्यापही समोर न आल्याने आता या वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दि. १३ एप्रिल २०२६ रोजी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
जळगाव शहर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेली तसेच आरोपींकडून जप्त करण्यात आलेली वाहने सध्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहेत. एकूण ४५ वाहने अद्यापही ताब्यात असून, त्यांच्या मालकांचा शोध घेण्याचे प्रयत्न करूनही कोणताही ठोस दावा पुढे आलेला नाही.
ही वाहने बराच काळ उघड्यावर पडून असल्याने गंजून खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे त्यांचा लिलाव करून त्यातून मिळणारा महसूल संबंधित प्रक्रियेनुसार वापरण्यात येणार आहे.
ज्या नागरिकांची वाहने गहाळ झाली आहेत किंवा ज्यांचे या जप्त वाहनांवर मालकी, तारण अथवा विमा हक्क आहेत, अशा व्यक्तींनी पुढील ६० दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह जळगाव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
