वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू आणि दोन महिन्यांचा संसार उद्ध्वस्त; हातोडा पुलाजवळील अपघाताने नंदुरबार हादरले.
एका भीषण अपघाताने दोन कुटुंबांचा आनंद,क्षणात हिरावून घेतला आहे. नुकताच संसार थाटलेला नवरदेव आणि वाढदिवशीच काळाच्या पडद्याआड गेलेला निष्पाप चिमुकला. हातोडा पुलाजवळील या हृदयद्रावक अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तळोदा-नंदुरबार मार्गावरील हातोडा पुलाजवळ काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी कारमध्ये भीषण धडक झाली
या अपघातात नवविवाहित युवकासह पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला असून नवविवाहिता निकिता गिरासे गंभीर जखमी झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार एमएच ०४ जीजे ०९३० क्रमांकाची स्विफ्ट कार आणि एमएच ३९ एआर ६०४३ क्रमांकाची पल्सर दुचाकी…
यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली,नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथील रहिवासी जयपालसिंग भारतसिंग गिरासे वय २६ अवघ्या दोन, महिन्यांपूर्वीच त्यांचे मोठ्या उत्साहात लग्न झाले होते,अंकलेश्वर येथे नोकरी करणारा जयपाल,अत्यंत होतकरू,शांत स्वभावाचा,आणि कुटुंबवत्सल युवक म्हणून ओळखला जात होता.
खान्देशातील पारंपरिक ‘आमरस-पूरणपोळी’ निमंत्रणासाठी जयपाल आणि त्यांची पत्नी निकिता प्रतापपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्यासोबत दोंडाईचा येथील साडूचा पाच वर्षीय मुलगा निरजकुमारही होता आणि विशेष म्हणजे त्या चिमुकल्याचा त्याचदिवशी वाढदिवस होता पाहुणचार आटोपून बलवंडकडे परतत असताना, हातोडा पूल ओलांडल्यानंतर.
पुढील वळणावर समोरून येणाऱ्या कारची दुचाकीला जोरदार धडक बसली,या भीषण अपघातात जयपालसिंग गिरासे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी निकिता गिरासे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान उपचारादरम्यान पाच वर्षीय निरजकुमार कल्याणसिंग गिरासे याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या दिवशी घरात वाढदिवसाचा आनंद साजरा व्हायचा होता,त्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांनी,घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार आणि वाढदिवशीच निघून गेलेले निष्पाप बालपण.
या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गिरासे कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे…

चेतन निकुंभे हे शनिमांडळ, नंदुरबार येथील वीर भगतसिंग अभ्यासिकेचे सदस्य तसेच शनि बजरंग सेवाभावी संस्था शनिमांडळ चे अध्यक्ष असुन ते एक शिक्षक, वक्ते आणि लेखक असुन ते समाजकार्यात कार्यरत असतात. चेतन निकुंभे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.
Email- sbsevabhavi54@gmail.co
Mobile -+91 99233 28654
