शिवाजी नगर, मलकापूर येथे अचानक लागलेल्या आगीत महिलेचे घर जळून नष्ट; अन्नधान्य व सर्व साहित्य खाक, प्रशासनाकडे मदतीची याचना.
मलकापूर : शहरातील शिवाजी नगर परिसरात भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेचे घर अचानक लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले असून सर्वस्व गमावल्याने महिलेवर मोठे संकट कोसळले आहे.
तबसूम अन्सार बी मोहम्मद अन्सार (रा. शिवाजी नगर, मंगल कार्यालयाजवळ) या महिला लाकूड व कचऱ्याचे साहित्य वापरून तयार केलेल्या घरात आपल्या दहा वर्षांच्या मुलीसह वास्तव्यास होत्या. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीत काही क्षणांतच घरातील संपूर्ण संसार भस्मसात झाला.
या आगीत घरातील कपडे, ज्वारी, गहू, कडधान्य, स्वयंपाकाची भांडी तसेच दैनंदिन वापरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. हातावर पोट असलेल्या या कुटुंबाचा अक्षरशः संसार उद्ध्वस्त झाला असून पिण्याच्या पाण्यापुरतेही साहित्य शिल्लक राहिले नाही. या घटनेनंतर महिलेने हंबरडा फोडत आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर जळून पूर्णतः नष्ट झाले होते.
दरम्यान, अग्निशमन कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष अतीक जवारीवाले यांना दिली असून संबंधित कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या सर्वस्व गमावलेल्या या महिलेने शासनाकडे मदतीची याचना केली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
