मुंबई-नाशिक महामार्गासह मुंबईतील जेव्हीएलआर आणि अंधेरी सबवे परिसरात पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सतंतधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ७-८ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास 3 तास वाहन चालक एकाच जागी अडकले होते. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना मोटा मनस्ताप सहन करावा लागला.
भिवंडी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबई-नाशिक महामार्गाला बसला आहे.
महामार्गावरील अर्धवट काम आणि पावसामुळे रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. राजनोली, पिंपळनेर, मानकोली ते खारीगाव टोलनाका या ७ते ८ किलोमीटर पट्ट्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. जवळपास २ ते ३ तास वाहनचालक याच कोंडीत अडकून पडले.
ट्रक, बस, खासगी गाड्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा विचार करावा आणि घाई करू नये असे अवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
मुंबईत वाहतूक कोंडी
मुंबईतील महत्त्वाचा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड म्हणजेच जेव्हीएलआर वर आज पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा फटका बसला. अंधेरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, सुरक्षेच्या कारणास्तव तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत असून, अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पाणी तातडीने उपसण्याची आणि सबवे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
