मुक्ताईनगरात कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त; बुरहानपूर रोडवरील स्मशानभूमी परिसरात प्रदूषण वाढले: Citizens are suffering due to burning of garbage in Muktai Nagar

Citizens are suffering due to burning of garbage in Muktai Nagar; Pollution has increased in the cemetery area on Burhanpur Road

मुक्ताईनगर | प्रतिनिधी :
मुक्ताईनगर नगरपंचायतीकडून बुरहानपूर रोडलगत असलेल्या स्मशानभूमी परिसरात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी जमा झालेल्या कचऱ्याला आग लावण्यात आली असून, त्यातून निघणाऱ्या धुरामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहतुकीवर तसेच परिसरातील वातावरणावर विपरीत परिणाम होत आहे.

या धुरामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अडचणी निर्माण होत असून, हवाप्रदूषणाची पातळीही वाढत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी आधीपासूनच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या कचऱ्यात कोंबड्यांचे अवशेष, शेळ्या-मेंढ्यांचे उरलेले भाग तसेच इतर सडलेले पदार्थ टाकले जातात. यामुळे परिसर अधिक अस्वच्छ बनत असून, आरोग्याचा धोका वाढत आहे. तसेच या ठिकाणी साचलेले सांडपाणीही दुर्गंधी आणि अस्वच्छतेस कारणीभूत ठरत आहे.

या प्रकारामुळे मुक्ताईनगरच्या स्वच्छतेवर परिणाम होत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे आणि अशा प्रकारे कचरा जाळण्यावर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

👉 नागरिकांची मागणी :

  • कचरा जाळण्याची प्रथा तात्काळ बंद करावी
  • नियमित कचरा व्यवस्थापन व्यवस्था लागू करावी
  • परिसराची स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात

✍️ सिद्धांत सावळे, मुक्ताईनगर +91 80879 31832

#muktainagar_pollution #sthanilsamachar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!