रस्त्याची दुरावस्था तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात खिर्डी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण…

रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १४ च्या दुरावस्थेविरोधात ग्रामस्थांनी गणेश मनोहर देवगीरकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनासह रस्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देऊनही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने खिर्डी बुद्रुक ग्रामस्थांचा बेमुदत उपोषणाचा निर्णय. मागण्या न मानल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा.

रावेर तालुका येथील खिर्डी बुद्रुकचे रहिवासी गणेश मनोहर देवगीरकर तसेच समस्त गावकरी हे दिनांक २६ जुलै २०२६ पासून सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग 14 हा खिर्डी या गावामधून जातो तरी या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. मुख्यतः गावच्या बस स्थानकापासून ते अभिषेक पाटील विद्यालयापर्यंतचा रस्ता हा अतिशय खराब झाला असून पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून नागरिकांची गैरसोय होताना पाहायला मिळतं आहे. तसेच साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्यामुळे ते पाणी कित्येक दिवस त्याच ठिकाणी साचून राहते.

या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बरेचसे अपघात झालेले असूनदेखील प्रशासन याकडे लक्ष का देत नाही.? असा सवाल नागरिकांना पडला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी निवेदने प्रशासनाला वारंवार देण्यात आली परंतु तात्पुरती रस्त्याची डाग-डूगी करून प्रशासनाने या समस्येला गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. वारंवार अर्ज/निवेदने करून देखील आपली मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे देवगिरकर आणि समस्त गावकरी यांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

खरंतर या भागाला २ आमदार आणि १ खासदार असून सुद्धा या भागाच्या पायाभूत सुविधांकडे एवढे दुर्लक्ष का होत आहे.? हा प्रश्न नागरिकांना पडत आहे.. लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावी नाहीतर पुढील दिवसांमध्ये रस्ता रोको करण्याचा इशारा समस्त गावकऱ्यांनी दिला आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!