शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक प्रतिनिधीची गरज असल्याचे मत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचा वरुड दौरा.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी वरुड तालुक्यात संवाद भेटी व प्रचार दौरा केला. या दौऱ्यात विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देत त्यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. शिक्षकांच्या शैक्षणिक, सेवाविषयक तसेच सामाजिक प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या प्रश्नांची प्रभावी मांडणी करण्यासाठी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून शिक्षकच विधान परिषदेत जाणे ही काळाची गरज आहे, अशी भूमिका या संवादादरम्यान शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी व्यक्त केली.
शिक्षक नेतृत्वाची आवश्यकता
ना. तु. रडके विद्यालयाचे मुख्याध्यापक बरडीया सर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक प्रतिनिधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपल्यातीलच एका सहकाऱ्याने सभागृहात जाऊन शिक्षकांच्या समस्या मांडणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे तसेच त्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची क्षमता असलेले नेतृत्व सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत यांनी शैक्षणिक क्षेत्रासमोरील वाढती आव्हाने आणि समस्या यावर भाष्य केले. शैक्षणिक क्षेत्रातील अधोगती थांबविण्यासाठी अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. प्रशांत विघे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी शिक्षकांनी उभे राहिल्यास शैक्षणिक क्षेत्राचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सकारात्मक दिशेने होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षकांच्या प्रश्नांवर सक्षम पाठपुराव्याची गरज
यावेळी प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाबाबत माहिती देत शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
शासनाच्या विविध निर्णयांमुळे शिक्षक आणि शाळांसमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा उल्लेख करत त्यांनी १५ मार्च २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णय, जुनी पेन्शन योजना, सेवा-सुरक्षा, अनुदान तसेच शिक्षकांच्या हिताशी संबंधित विविध शासन निर्णयांचा संदर्भ दिला.
मागील काही वर्षांतील शासन निर्णयांचा अभ्यास केल्यास शिक्षकांच्या हिताशी संबंधित अनेक प्रश्नांवर अधिक स्पष्टता आणि ठोस पाठपुराव्याची आवश्यकता जाणवते, असे प्रा. डॉ. विघे यांनी सांगितले.
शिक्षकांच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेला आणि शासनस्तरावर अनुकूल निर्णय मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे पाठपुरावा करू शकणारा प्रतिनिधी निवडणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
विविध शाळा-महाविद्यालयांना भेटी
या संवाद दौऱ्यात प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी वरुड तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये स्व. माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय व शंकरराव वंदे कनिष्ठ महाविद्यालय, पावडे महाविद्यालय जरुड, महात्मा फुले विद्यालय धनोडी, उत्क्रांती शिक्षण संस्था संचालित वसंतराव नाईक विद्यालय जरूड आणि ऑरेंज सिटी इंग्लिश स्कूल, वरुड यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान शिक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून आगामी काळातील पाठपुराव्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या संवाद दौऱ्यात ज्येष्ठ शेतकरी नेते दिलीप भोयर, शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंत रामराव वानखेडे, प्रा. डॉ. प्रशांत चर्जन, आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे गणेश कुसराम, प्रमोद राऊत, मुख्याध्यापक बंडू गावंडे, देवराळे सर, प्रवीण मोहोड, मयूर देवहाते, लवसिंग राठोड, विजय राठोड आणि वैभव भगत यांच्यासह विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या संवाद दौऱ्यात शिक्षकांच्या समस्या आणि आगामी काळातील शैक्षणिक धोरणांवर व्यापक चर्चा होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रा. डॉ. प्रशांत विघे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील माहिती आणि लेख उपलब्ध करून देतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी लेख प्रकाशित करतात.
मो. क्र. -९३२६८७७७४९
