संशोधन क्षेत्रात मुक्ताईनगरचा गौरव : डॉ. ए. बी. शेख यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यानंतर डॉ. ए. बी. शेख यांचा सत्कार करण्यात आला.

१२ वर्षांचा अध्यापन अनुभव असलेल्या डॉ. ए. बी. शेख यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच.डी. मिळवत संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

 संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथील राहणार डॉ. ए. बी. शेख यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशामुळे मुक्ताईनगर तालुक्यासह शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

डॉ. शेख यांनी अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर संशोधन क्षेत्रात हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यांचे हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना आदरणीय प्रा. डॉ. रवी केसूर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका आठवड्यात दुसरे संशोधक पीएच.डी. पदवीधर झाल्याने शैक्षणिक वर्तुळात विशेष कौतुक व्यक्त होत आहे. संशोधक डॉ. ए. बी. शेख आणि मार्गदर्शक डॉ. रवी केसूर या दोघांचेही विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. ए. बी. शेख यांचे शैक्षणिक पात्रता उल्लेखनीय असून त्यांनी M.Com, MBA (HRM), B.Ed., GDC&A तसेच पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना प्राध्यापक म्हणून १२ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे.

पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी मार्गदर्शक प्रा. डॉ. रवि केसुर सर, धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन मंडळ, संत मुक्ताबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.डी. पाटील सर तसेच BCA विभाग प्रमुख डॉ. ए. जी. कुळकर्णी तसेच आपल्या परिवारातील सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

डॉ. शेख यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधनाबाबत नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!