क्विक हील फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा उपक्रमाला बोरीतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डिजिटल सुरक्षितता आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना.
कमला नेहरू ज्युनिअर कॉलेज, बोरी येथे क्विक हील फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परमेश्वर पांढरे आणि साहिल जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत लाईव्ह हॅकिंगचे प्रात्यक्षिक सादर केले.
लाईव्ह डेमोच्या माध्यमातून ऑनलाइन जगात होणाऱ्या विविध सायबर धोक्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, सायबर गुन्हे तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी क्विक हील अँटी फ्रॉड ॲपविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. ॲपची वैशिष्ट्ये आणि डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दगडू पाटील सरपंच, दगडू पडिले सरपंच, गणपत रातोळे शिक्षक आणि सदाशिव कुलकर्णी शिक्षक उपस्थित होते.
या उपक्रमात कार्तिक मोतिपुले, मावली रेड्डी, यश मेंडीकर आणि कृष्णा शेंडाळे यांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
“डिजिटल जगात प्रत्येक क्लिकपूर्वी विचार करा आणि सायबर सुरक्षेला प्राधान्य द्या,” असा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
