जळगाव समाजकल्याण विभागांतर्गत चाळीसगाव निवासी शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण, निवास, डिजिटल क्लासरूम, टॅब सुविधा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासह प्रवेश सुरू.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जळगाव यांच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया १ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.
इयत्ता ६ वीच्या वर्गासाठी आरक्षित जागांनुसार एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामध्ये ८० टक्के जागा अनुसूचित जाती, १० टक्के अनुसूचित जमाती, ५ टक्के वि.जा.भ.ज., ३ टक्के वि.मा.प्र. तसेच २ टक्के जागा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच इयत्ता ७ वी ते १० वीच्या वर्गांतील रिक्त जागांनुसारही प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.
सध्या प्रवेशासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुरू असून पालकांनी आपल्या पाल्यांची लवकरात लवकर नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणासोबत आनंददायी अध्यापन पद्धती, प्रशिक्षित शिक्षकवर्ग, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, इयत्ता ८ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅब सुविधा, अद्ययावत संगणक कक्ष, स्वतंत्र रात्र अभ्यासिका, विज्ञान प्रयोगशाळा, मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश, शालेय साहित्य, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त इमारत, निवास व भोजन व्यवस्था, क्रीडांगण व क्रीडा साहित्य तसेच सुरक्षा रक्षक आणि २४x७ सीसीटीव्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगाव – ०२५७-२२६३३२८, सागर विशे (मुख्याध्यापक) – ७०२१४१३९७० तसेच लक्ष्मीकांत कोठावदे (प्र. गृहपाल) – ९४२०६९५७९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
