भारतीय राज्यघटना ही देशाचा सर्वोच्च कायदा आहे. तिची निर्मिती, उद्दिष्टे आणि भारतीय नागरिकांसाठीचे महत्त्व याविषयी थोडक्यात माहिती.
भारतीय राज्यघटना ही भारताच्या शासनव्यवस्थेचा सर्वोच्च कायदा असून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ती स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० पासून ती संपूर्ण देशात लागू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीने राज्यघटनेची निर्मिती केली. भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची हमी देते. तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि शासनाच्या कार्यपद्धतीचे स्पष्ट मार्गदर्शन करते. जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटना देशाच्या लोकशाही, एकात्मता आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणारा भक्कम पाया मानली जाते.
भाग I – संघ आणि त्याचे राज्य क्षेत्र
- अनुच्छेद १ : संघाचे नाव आणि राज्यक्षेत्र
- अनुच्छेद २ :नवीन राज्यांचा संघात प्रवेश किंवा स्थापना
- अनुच्छेद ३ :नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांच्या क्षेत्रफळ, सीमा किंवा नावामध्ये बदल
- अनुच्छेद ४ :अनुच्छेद २ आणि ३ अंतर्गत करण्यात आलेल्या कायद्यांद्वारे अनुसूचींमध्ये सुधारणा आणि पूरक तरतुदी
भाग II –नागरिकत्व
- अनुच्छेद ५ :राज्यघटना लागू होताना नागरिकत्व
- अनुच्छेद ६ :पाकिस्तानमधून भारतात स्थलांतर केलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व
- अनुच्छेद ७ :भारतातून पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व
- अनुच्छेद ८:भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचे नागरिकत्व
- अनुच्छेद ९ : परदेशी नागरिकत्व स्वेच्छेने स्वीकारणाऱ्या व्यक्तींचे भारतीय नागरिकत्व
- अनुच्छेद १०: नागरिकत्वाच्या अधिकारांचे सातत्य
- अनुच्छेद ११ : नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा संसदेचा अधिकार
भाग III – मूलभूत अधिकार
- अनुच्छेद १२ : राज्याची व्याख्या – Definition of State
- अनुच्छेद १३ : मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेल्या कायद्यांची अमान्यता

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
